शिरगाव किल्ल्यावर मशाल महोत्सव

शिरगाव किल्ल्यावर मशाल महोत्सव

पालघर, ता. १२ (बातमीदार) ः समुद्रकिनारी असलेल्या शिरगाव किल्ल्यावर शिवजयंतीच्या निमित्ताने मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी पंचक्रोशीतील नागरिकांनी मशालीने उजळून निघालेल्या किल्ल्याचे विलोभनीय दृश्य अनुभवले.

सकाळी सात वाजता शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे किल्ल्यामध्ये विधिवत पूजन करण्यात आले. संध्याकाळी पाच वाजता शिरगावजवळील धनसार गावातील भवानी मंदिरातून मानाची मशाल घेऊन पायी मिरवणुकीने शिवभक्तांनी किल्ल्याकडे प्रयाण केले. शिरगाव येथील आठ वर्षीय मैत्री ठाकूर या चिमुरडीने सुमारे तीन मिनिटांचे महाराजांचे पाळणा गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर काही तरुण-तरुणींनी महाराजांच्या गीतावर नृत्य सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. पालघर पोलिस उपअधीक्षक पंकज शिरसाठ यांच्या हस्ते मानाच्या मशालीने इतर मशाली प्रज्वलित केल्यावर किल्ल्यावर तयार असलेल्या २३० मशाली प्रज्वलित करण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com