‘परिवहन’च्या बदली रॅकेटचा 
एसआयटी करणार तपास

‘परिवहन’च्या बदली रॅकेटचा एसआयटी करणार तपास

सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. १२ ः परिवहन खात्यातील सर्व बदल्या ऑनलाईन व्हाव्यात, असे ठरले असतानाही नागपूर तसेच काही शहरात परस्पर बदल्या करणारे एक रॅकेट कार्यरत होते. एका पंचतारांकित हॉटेलात या संबंधीचे व्यवहार झाल्याची तक्रार येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीसाठी एसआयटी नेमण्याची घोषणा केली आहे. नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणी विरोधकांकडून कारवाईची मागणी होण्याची शक्यता आहे.
परिवहन खात्यातील एका निवृत्त अधिकाऱ्याने एका हॉटेलातून परिवहन विभागातील बदल्यांबाबत हालचाली केल्याची चर्चा आहे. यासंदर्भात नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी चौकशी करण्यासाठी सायबर विभाग, आर्थिक गुन्हे शाखा आणि गुन्हे शाखेचे त्रिसदस्यीय पथक स्थापन केले आहे. त्यानुसार हॉटेलचे फुटेज तपासून या संदर्भातला अहवाल सादर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नोव्हेंबर महिन्यात परिवहनच्या सर्व बदल्या ऑनलाईन करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात यासंबंधातला तपशील तयार झाल्यानंतरही गैरव्यवहार झालाच कसा, असा प्रश्न करण्यात येत आहे. मविआ सरकारच्या काळातही या विभागातील बदल्यांचे गैरव्यवहार नागपूर आणि विदर्भातूनच झाले होते. सामाजिक कार्यकर्ते आणि नागपुरातील ज्येष्ठ वकील तुषार मंडलेकर यांनी परिवहन खात्यात दलालांचा सुळसुळाट झाला असून या संबंधात चौकशीचे आदेश दिल्यास भ्रष्टाचाराला वेसण बसेल, असे विधान केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com