वाड्यात शिवजयंती उत्साहात साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाड्यात शिवजयंती उत्साहात साजरी
वाड्यात शिवजयंती उत्साहात साजरी

वाड्यात शिवजयंती उत्साहात साजरी

sakal_logo
By

वाडा, ता. १३ (बातमीदार) : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा शाखेच्या वतीने गणेश मैदान वाडा येथे तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस कुणाल साळवी व मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच शिवव्याख्याते ॲड. स्वप्नील पाडेकर यांच्या शिवव्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमप्रसंगी पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, ठाणे ग्रामीणचे प्रभारी व ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे, डॉ. हेमंत सवरा, जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार, प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, ज्येष्ठ नेत्या शुभांगी उतेकर, संदीप पावडे, समीर पाटील, रोहन पाटील, मोनिष पाटील आदींसह कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.