विक्रमगडमध्ये ‘हात से हात जोडो’ अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगडमध्ये ‘हात से हात जोडो’ अभियान
विक्रमगडमध्ये ‘हात से हात जोडो’ अभियान

विक्रमगडमध्ये ‘हात से हात जोडो’ अभियान

sakal_logo
By

विक्रमगड, ता. १३ (बातमीदार) : विक्रमगड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘हात से हात जोडो’ अभियान राबवण्यात आले. विठ्ठल मंदिर विक्रमगड येथून रॅलीची सुरुवात होऊन पाटील पाडा, दगडी चाळ, बाजार पेठ येथे जनतेमध्ये जनजागृती करण्याकरिता काँग्रेस पक्षाची पत्रके वाटण्यात आली. विक्रमगड बाजारपेठेमध्ये किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे, पालघर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, उपाध्यक्ष मधुकर चौधरी, विक्रमगड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष घनश्याम आळशी, मोईज शेख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. केंद्र सरकार अदाणी-अंबानी व धनदांडग्यांच्या मागे कसे आहे त्याचा परामर्श त्यांनी आपल्या भाषणात घेतला. याप्रसंगी हरेश डगला, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष रमेश दोडे, कार्याध्यक्ष यादव गभाले, शहराध्यक्ष द्रुपद पटेल, शरयू औसरकर, सखाराम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.