क्षयरोग पीडित मुलींना गरजेच्या वस्तूंचे वाटप

क्षयरोग पीडित मुलींना गरजेच्या वस्तूंचे वाटप

भिवंडी, ता. १३ (बातमीदार) : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मेक अ विश इंडिया या संस्थेतर्फे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यानिमित्ताने भिवंडी महानगरपालिकाअंतर्गत येथील अवचितपाडा नागरी आरोग्य केंद्रातील ११ ते १७ वयोगटातील क्षयरोगबाधित मुलींकरिता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. क्षयरोगबाधित मुलींच्या काही दिवसांपूर्वी या संस्थेमार्फत मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमामध्ये त्यांच्या गरजेनुसार पालिकेमार्फत त्यांना सायकल, मोबाईल, लॅपटॉप, टॅब, टी. व्ही., खेळणी आदी वस्तूंचे २७ मुलींना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात मुलींना क्षय आजाराबाबत जागृती करण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व समजून सांगण्यात आले. वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बुशरा सय्यद यांनी आरोग्यविषयी माहिती दिली. या वेळी घनश्याम वर्मा, स्मिता पाटील, मोबीन शेख, अशोक साबळे, अनिल गुप्ता, विवेक गायकवाड व सुभाष माने आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com