पडघ्यात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पडघ्यात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात
पडघ्यात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात

पडघ्यात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात

sakal_logo
By

पडघा, ता. १३ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील पडघा येथे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेना उपनेते प्रकाश पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेरेकर इस्टेट येथील मैदानावर कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. या वेळी जिल्ह्यातील विविध नामांकित कबड्डी संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये अ गटातून उजाला वळ हा कबड्डी संघ विजयी ठरला. त्यांना ३० हजार ८८८ रुपये व ट्रॉफी; तर ब गटातून जय बजरंग वासींद हा कबड्डी संघ विजयी ठरला; त्यांना २० हजार ८८८ रुपये व ट्रॉफी देण्यात आली. उपनेते प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, पंडित पाटील, उपजिल्हाप्रमुख विष्णू चंदे, सरपंच अमोल बिडवी, डॉ. संजय पाटील, उद्योजक मनोहर ठाकरे, गौरव पाटील, प्रसाद कथोरे, जयेश जाधव यांच्या हस्ते बक्षिसे देऊन विजेत्यांना गौरवण्यात आले.