वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त
वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त

वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त

sakal_logo
By

बोर्डी, ता.१३ (बातमीदार) : अचानक उष्णता वाढल्यामुळे शहर परिसरासह ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. शेती, बागायतीवरही याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. गेल्‍या आठवड्यात होळीच्या दिवशी पाऊस झाल्यानंतर दोन-तीन दिवस हवेत आल्हाददायक गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिक सुखावले होते. मात्र मागच्या दोन दिवसापासून ढगाळ हवामानामुळे अचानक उष्णता वाढली आहे. सोमवारी (ता.१३) रोजी दुपारी या भागात ३६ डिग्री तापमान झाल्याने प्रचंड उकाडा वाढला आहे. संपूर्ण आभाळ भरल्यामुळे परिसरात केव्हाही पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. असंतुलित हवामानामुळे भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आंबा बागायतदारही हवालदिल झाला आहे.