Mon, June 5, 2023

दिलशाद शेख यांची नियुक्ती
दिलशाद शेख यांची नियुक्ती
Published on : 13 March 2023, 11:07 am
पडघा, ता. १३ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील पडघा येथील रहिवाशी दिलशाद शेख यांची शिवसेना प्रणित न्यू हिंदुस्थान कामगार सेनेच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. या वेळी प्रकाश मिसाळ यांची महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. या दोन्ही पदाधिकाऱ्यांची नियुक्तीपत्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आली. या वेळी उद्योगमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री उदय सामंत, न्यू हिंदुस्थान कामगार सेना सरचिटणीस हर्षवर्धन साईवाला उपस्थित होते.