साठगावात जलजीवन योजनेचे भूमीपूजन

साठगावात जलजीवन योजनेचे भूमीपूजन

किन्हवली, ता. १३ (बातमीदार) : ठाणे जिल्हा परिषदेच्या मळेगाव गटातील साठगाव येथील जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन जिल्हा परिषद माजी सदस्य राजेंद्र विशे व पंचायत समितीच्या माजी सदस्या दक्षता लकडे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्यासाठी नळजोडणी करण्याच्या उद्देशाने शासनाकडून जलजीवन योजना राबवण्यात येत आहे. मळेगाव जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य राजेंद्र विशे व पंचायत समिती माजी सदस्या दक्षता लकडे यांच्या प्रयत्नानी मंजूर झालेल्या साठगाव येथील जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करून कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी दीपक लकडे, लक्ष्मण विशे, गोपाळ हजारे, गोविंद विशे, घनश्याम गायकवाड, साठगावचे सरपंच पूजा विशे, उपसरपंच किशोर गणपत विशे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com