जुन्या पेन्शनसाठी आज संप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्या पेन्शनसाठी आज संप
जुन्या पेन्शनसाठी आज संप

जुन्या पेन्शनसाठी आज संप

sakal_logo
By

अलिबाग, ता. १३ (बातमीदार)ः जुनी पेन्शन लागू करा, या मागणीसाठी अनेक महिन्यांपासून शासनदरबारी दाद मागितली जात आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने रायगड जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांसह आरोग्य व शिक्षक अशा वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, महापालिका, नगरपालिका, नगर पंचायतीमधील कर्मचारी व शिक्षक असे एकूण पंधरा हजार कर्मचारी या संपात सामील होणार आहेत, त्याचा परिणाम जिल्ह्यातील वेगवेगळ्या विभागांतील कामकाजावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच सर्वसामान्यांसह विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे, पण जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संपावर गेल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार नसल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी दिली आहे; मात्र शासकीय कार्यालये बंद असल्याने सर्व कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता समन्वय समितीचे निमंत्रक प्रभाकर नाईक यांनी व्यक्त केली आहे.