बौद्ध वाड्यातील समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना गाऱ्हाणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बौद्ध वाड्यातील समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना गाऱ्हाणे
बौद्ध वाड्यातील समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना गाऱ्हाणे

बौद्ध वाड्यातील समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना गाऱ्हाणे

sakal_logo
By

जव्हार, ता. १३ (बातमीदार) : शहरातील बौद्ध वाडा परिसरात शेकडो वर्षांपासून राहत असलेल्या नागरिकांच्या नावे अद्याप जमीन आणि घराची मालकी नाही. नागरिकांना रहिवासी जागा नियमित करून प्रत्येक रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे, यासाठी चर्मकार समाज राज्य समितीचे सदस्य विनीत मुकणे यांनी पुढाकार घेत शिष्टमंडळासह जव्हार येथील विश्रामगृहात पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांची सोमवारी (ता. १३) भेट घेत निवेदन सादर केले. मुकणे यांनी जिल्हाधिकारी बोडके यांच्याकडे नागरिकांच्या समस्या मांडल्या. जिल्हाधिकारी यांनी सकारात्मकता दाखवत मुकणे यांच्या शिष्टमंडळाला उपलब्ध आणि आवश्यक कागदपत्रे, पुराव्यासह पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे उद्या (ता. १४) उपस्थित राहण्यास सांगितले आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून ही समस्या असून येथील नागरिकांना घरे बांधताना बँक कर्ज घेताना प्रॉपर्टी कार्डचा अडथळा निर्माण होत असून ती समस्या सुटावी, अशी आशा येथील नागरिकांनी व्यक्त केली.