दोन दुचाकींच्या धडकेत एकाचा मृत्यू

दोन दुचाकींच्या धडकेत एकाचा मृत्यू

मनोर, ता. १३ (बातमीदार) : मनोर-विक्रमगड रस्त्यावर भोपोली गावच्या हद्दीत आज (ता. १३) भरधाव वेगातील दोन दुचाकी एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू; तर चार जण जखमी असून एक जण गंभीर आहे. या प्रकरणी मनोर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जखमींना उपचारासाठी मनोरच्या आस्था आणि गुजरातमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनोर-विक्रमगड रस्त्यावर भोपोली गावच्या हद्दीत रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास भरधाव वेगातील दोन दुचाकी एकमेकांना धडकल्या. या अपघातात विक्रमगड तालुक्यातील वेढा गावच्या राजू डोळे (वय २४) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com