अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे अटकेत
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे अटकेत

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे अटकेत

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : पालघर येथे पळवून नेत गुंगीचे औषध देऊन १७ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनी वांद्रे पश्चिम येथून पीडित मुलीला जबरदस्तीने वाहनात बसवून गुंगीचे औषध देत पालघरला नेले. तेथे एका घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पीडिता शुद्धीवर आल्यानंतर तिने एकाला जाब विचारला, त्यावर त्याने त्याच्या साथीदाराला पुन्हा तिच्यावर अत्याचार करण्यास सांगत त्याचे चित्रीकरण केले. तसेच संबंधित प्रकार कोणाला सांगितल्यास आईला जीवे मारण्याची धमकी दिली. शनिवारी (ता. ११) पीडितेच्या आजारी असलेल्या आईला रुग्णालयात पाहण्यासाठी एक जण आला होता. त्या वेळी त्याने बटवा विसरल्याचा बहाणा करून पीडितेला बोलावून घेतले. तसेच मारहाण करून त्याच्यासोबत येण्यास जबरदस्ती केली. कंटाळून पीडितेने याप्रकरणी वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.