तीनपट मालमत्ता कर रद्द करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीनपट मालमत्ता कर रद्द करा
तीनपट मालमत्ता कर रद्द करा

तीनपट मालमत्ता कर रद्द करा

sakal_logo
By

जुईनगर, ता. १३ (बातमीदार) : नवी मुंबईतील गरजेपोटी बांधलेल्या ५ हजार घरांना लावण्यात आलेला तीनपट मालमत्ता कर रद्द करावा, असे निर्देश नगरविकास विभागाने नवी मुंबई महापालिकेला दिले आहेत. या निर्णयामुळे बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी शासनदरबारी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
नवी मुंबईतील २९ गावांतील गरजेपोटी बांधलेल्या घरांना नवी मुंबई महापालिकेने तीन पट टॅक्स लावला होता; तर रकमेवर १८ टक्के व्याज आकारले जाणार होते. नवी मुंबईतील पाच हजार घरांना पालिकेमार्फत याबाबतच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील इतर घरांना वेगळा कर व ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांना वेगळा कर आकारण्यात येणार असल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली होती. नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी नवी मुंबई शहर वसवताना आपल्या शंभर टक्के जमिनी दिल्या आहेत. त्यांच्याच स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर बांधलेल्या घरांना लावण्यात आलेला तीन पट मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार मंदा म्हात्रे यांनी केली होती.