गोखले उड्डाणपुलाचे १६ गर्डर हटविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोखले उड्डाणपुलाचे १६ गर्डर हटविले
गोखले उड्डाणपुलाचे १६ गर्डर हटविले

गोखले उड्डाणपुलाचे १६ गर्डर हटविले

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १३ : अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाचे १६ गर्डर काढण्याचे काम पश्चिम रेल्वेने विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे. आता इतर काम पूर्ण झाल्यानंतर ३१ मार्चपर्यंत पालिकेच्या ताब्यात पूल देण्यात येणार आहे. त्यानंतर पालिका पुलाची पुनर्बांधणी करणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

गोखले पुलाचे १६ स्टील गर्डर हटवण्यासाठी पश्चिम रेल्वेने ११ ते १२ मार्चला रात्रकालीन विशेष ब्लॉक घेतला होता. यासाठी अप धीमा, अप डाऊन जलद मार्गावर, फलाट क्र. ४ वर ४.३० तासांचा ब्लॉक; पाचव्या मार्गावर आणि फलाट क्र. ९ मार्गावर ८ तासांचा ब्लॉक; तर अप आणि डाऊन हार्बर मार्गावर दोन तासांचा ब्लॉक घेतला होता. ब्लॉक कालावधीत ७००, २४० आणि १० मेट्रिक टन क्रेनच्या मदतीने हे गर्डर काढण्यात आले. पाडकाम पूर्ण झाल्यानंतर ३१ मार्चपर्यंत महापालिकेच्या ताब्यात पूल देण्यात येणार आहे. त्यानंतर पालिका या पुलाची पुनर्बांधणी करेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.