Wed, May 31, 2023

विमानात धुम्रपान करणाऱ्याला जामीन
विमानात धुम्रपान करणाऱ्याला जामीन
Published on : 13 March 2023, 3:49 am
मुंबई, ता. १३ : एअर इंडियाच्या विमानामध्ये धूम्रपान आणि असभ्य वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या ३४ वर्षीय रमाकांत द्विवेदी या अमेरिकन नागरिकाला सोमवारी मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. एअर इंडियाच्या ‘एआय १३०’ विमानाने १० मार्चला लंडनहून रात्री ९.३० वाजता मुंबईला जाण्यासाठी उड्डाण केले. विमानतळ टॉयलेटमध्ये रमाकांत द्विवेदी धूम्रपान करत होता. शनिवारी (ता. ११) विमान मुंबई विमानतळावर पोहोचताच क्रू मेंबर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी द्विवेदीला पकडून पोलिसांच्या हवाली केले होते.