मालाडच्या झोपडपट्टीत अग्नितांडव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालाडच्या झोपडपट्टीत अग्नितांडव
मालाडच्या झोपडपट्टीत अग्नितांडव

मालाडच्या झोपडपट्टीत अग्नितांडव

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : ओशिवरा येथील फर्निचर गोदामाला लागलेली आग आटोक्यात येत नाही, तोच मालाडच्या आनंदनगर येथील आप्पापाडा परिसरातील झोपडपट्टीला सोमवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान, आगीत एका अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह सापडला. त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. घरगुती सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
मालाडच्या आप्पापाडा झोपडपट्टीला दुपारी ४.५२ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. घटनेबाबात माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश मिळाले. कूलिंग ऑपरेशनवेळी जवानांना एका अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळला. मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला असून त्याची ओळख पटवली जात आहे. ताडपत्री, प्लास्टिक, लाकडी साहित्य, कागद तसेच भंगारासारख्या ज्वलनशील वस्तूंमुळे झोपडपट्टीत आग वेगाने पसरत गेली. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, आगीच्या धुराचे लोट काही किलोमीटर अंतरावरून दिसत होते.