विधी सेवा, महिला आयोगातर्फे महिला दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधी सेवा, महिला आयोगातर्फे महिला दिन
विधी सेवा, महिला आयोगातर्फे महिला दिन

विधी सेवा, महिला आयोगातर्फे महिला दिन

sakal_logo
By

कासा, ता. १४ (बातमीदार) : तालुका विधी सेवा समिती, राष्ट्रीय महिला आयोग तसेच डहाणू तलासरी वकील संघटनेतर्फे जागतिक महिला दिन डहाणू तालुक्यातील ऐना येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ॲड. मोहन वंजारी, ॲड. राहुल कडू, ॲड. नांदलस्कर, ॲड. बेलकर, प्रभुदास गावित यांनी महिलांना दिवाणी तसेच फौजदारी कायदे, घरगुती हिंसाचार संरक्षण, महिला आयोग या विषयी प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. डहाणू न्यायालयातील सहदिवाणी न्यायाधीश डी. एम. गुलाटी यांनी महिलांनी शिक्षणात प्रगती केल्याशिवाय महिलांना मिळालेल्या ५० टक्के आरक्षणाचा फायदा आपल्याला घेता येणार नाही, अत्याचारित महिला आपल्या कोर्टात आल्यास आपण त्यांना योग्य तो न्याय देऊ, असे मार्गदर्शन केले. या वेळी न्यायाधीश वळवी, डहाणू न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एच. एन. पोले, ॲड. विराज गडग, डहाणू तलासरी वकील संघटनेचे सचिव ॲड. दिनेश वंजारी, न्यायालयातील कर्मचारी, महिला कर्मचारी, पोलिस कर्मचारी उपस्थित होते.