पालघर नगरपरिषदेचा क्रीडा महोत्सव जल्लोषात

पालघर नगरपरिषदेचा क्रीडा महोत्सव जल्लोषात

पालघर, ता. १४ (बातमीदार) : पालघर जिल्हा सर्व प्रकारच्या खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर चमकत आहे. पालघर शहरातील खेळाडूंनीसुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवून भारताचा तिरंगा फडकवला पाहिजे. यासाठी खेळाडूंना नगर परिषदेकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल, असे आश्वासन नगराध्यक्ष उज्ज्वला काळे यांनी पालघर नगरपरिषद आयोजित शालेय क्रीडा महोत्सवात दिले.
आचारसंहितेमुळे लांबलेला पालघर नगर परिषदेचा क्रीडा महोत्सव रविवारी (ता. १२) पार पडला. रखरखत्या उन्हातसुद्धा खेळाडूंनी क्रीडांगणावर आपले कौशल्य दाखवले. या महोत्सवात पालघर शहरातील १४ शाळांनी सहभाग नोंदवला. कबड्डी, खो-खो, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक व भालाफेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये ५८४ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. सांगता समारंभाच्या कार्यक्रमाला नगराध्यक्ष उज्ज्वला काळे, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती चंद्रशेखर वडे, नगरसेविका अनुजा तरे, चेतना गायकवाड, हिंदवी पाटील, रोहिणी अंभूरे, गीता संखे, अलका राजपूत उपस्थित होते.

---------------------
स्पर्धेतील विजेते संघ
मुलींच्या कबड्डी स्पर्धेत आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या म. नी. दांडेकर हायस्कूलने विजेतेपद पटकावले; तर जीवन विकास हायस्कूलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुलांमध्ये जिल्हा परिषद शाळा वेवूरने प्रथम क्रमांक पटकावला; तर होली स्पिरीट हायस्कूलने द्वितीय क्रमांक पटकावला. मुलींच्या खो-खोमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नवलीने प्रथम क्रमांक; तर द्वितीय क्रमांक जीवन विकास हायस्कूलने पटकावला. मुलांमध्ये जीवन विकास हायस्कूलने विजेतेपद; तर केनम हायस्कूलने उपविजेतेपद पटकावले. या क्रीडा महोत्सवामध्ये शहरातील जिल्हा परिषद शाळांच्या मुलांनी सर्व प्रकारच्या खेळामध्ये चमकदार कामगिरी करत आपला ठसा उमटवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com