Fri, March 31, 2023

वसई न्यायालयात शिवजयंती साजरी
वसई न्यायालयात शिवजयंती साजरी
Published on : 14 March 2023, 10:52 am
वसई, ता. १४ (बातमीदार) : पालघर जिल्हा शिव विधि व न्याय सेनेच्या वतीने वसई दिवाणी व फौजदारी न्यायालयात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. शिव विधि व न्याय सेना पालघर जिल्हा अध्यक्ष ॲड. दिनेश आदमणे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण करून अभिवादन केले. याप्रसंगी वसई तालुका बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष ॲड. साधना धुरी, ज्येष्ठ वकील मेधा जयकर, ॲड. आनंद घरत यांच्यासह अन्य वकील उपस्थित होते. ॲड. वैभव पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले; तर ॲड. कुणाल कोदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.