
अर्थसंकल्प आनंद देणारा ः डावखरे
कल्याण, ता. १४ (बातमीदार) ः राज्यातील भाजप-शिवसेना युतीचे सरकार समजाप्रति संवेदनशील आहे. अध्यात्म आणि विकासाचा सुवर्णसंगम साधणारा हा पंचामृत अर्थसंकल्प आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प प्रत्येक व्यक्तीला आनंद देणार असल्याचे मत भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केले. अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी डावखरे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी डावखरे म्हणाले की, हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि संपूर्ण राज्याला विकासाची दिशा देणारा आहे. महाराष्ट्राला देशात अव्वल स्थानावर कायम ठेवणारा आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जनभागीदारीतून अर्थसंकल्प सादर केला गेला, असे डावखरे म्हणाले. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रे, महिला मोर्चा अध्यक्ष रेखा चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष नाना सूर्यवंशी, माजी नगरसेवक अर्जुन भोईर, वरुण पाटील, वैशाली पाटील, आशीष पावसकर, कल्याण पश्चिमचे अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, शिवाजी आव्हाड आदी उपस्थित होते.