मोफत उपचार उपलब्ध करून देण्याची मागणी

मोफत उपचार उपलब्ध करून देण्याची मागणी

कल्याण, ता. १४ (बातमीदार) ः राज्य सरकारने सर्व प्रकारच्या रेशन कार्डधारकांना ५ लाखांपर्यंत सर्व रुग्णालयांमध्ये मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नोवेल साळवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मोठमोठ्य दवाखान्यात शासनाच्या लाभार्थ्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. तसे होऊ नये म्हणून सरकारने प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात दवाखान्याच्या कामकाजावर देखरेख करणारी यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे, असे साळवे यांनी सांगितले. रुग्णाचा शासकीय योजनेअंतर्गत इलाज सुरू असताना त्याला बाहेरून औषधे आणण्यास सांगण्यात येते. मोठी खासगी रुग्णालये सरकारच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे सामान्य जनतेच्या मोफत आरोग्य उपचारासाठी राज्यात प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात सुसज्ज सरकारी रुग्णालय तय्यार करावेत. ज्यामध्ये सर्व प्रकारच्या रुग्णांची औषधे आणि इतर गोष्टी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी साळवे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com