कल्याणध्ये कर्तृत्ववान  महिलांचा सन्मान

कल्याणध्ये कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

कल्याण, ता. १४ (बातमीदार) ः इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने कल्याणमधील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. या वेळी महिलांनी नृत्य-नाट्याचा आविष्कार सादर केला. याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणतर्फे के. सी. गांधी शाळेच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी वैशाली प्रमोद जोशी, जयश्री सुधीर भावे, वर्षा म्हेतर, सोनाली पांचाळ, डॉ. सोनाली पितळे-सिंग यांच्यासह जान्हवी संजय जाधव या तरुणीचा डॉ. विजय सूर्यवंशी आणि डॉ. आरती सूर्यवंशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी डॉ. आरती सूर्यवंशी यांनी महिलांच्या आयुष्यावर आधारित सादर केलेल्या कवितेला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली. या वेळी इतिहासकालीन स्त्रियांचा जीवनपट उलगडणारे नाट्य मीना सोनवणे यांनी सादर केले. या वेळी कल्याणचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, पालिका सचिव संजय जाधव, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ अशोक प्रधान, के. सी. गांधी शाळेचे विश्वस्त मनोहर पालन, रोटरी क्लबचे मदन शंकलेशा आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडीयन मेडिकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, उपाध्यक्ष डॉ. ईशा पानसरे यांच्यासह सर्वच सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com