खानदेश मंडळाचा मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खानदेश मंडळाचा मेळावा
खानदेश मंडळाचा मेळावा

खानदेश मंडळाचा मेळावा

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १४ (बातमीदार) ः उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचालित ‘जागतिक आहिराणी भाषा संवर्धन परिषद’ आणि महिला आघाडीतर्फे ११ मार्च रोजी जागतिक महिला दिन आणि अहिराणी दिनानिमित्त महाराजा सयाजीराव गायकवाड जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील उपस्थित होते; तर प्रमुख वक्ते म्हणून बापूसाहेब हटकर उपस्थित होते. आता खानदेशचे नाव ‘कान्हदेश’ झाले पाहिजे असे प्रतिपादन या वेळी हटकर यांनी केले. या वेळी एल. आर. पाटील, अर्जुन पाटील, प्रदीप अहिरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. एन. एम. भामरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

भाषा संवर्धन, तसेच विविध उपक्रम खानदेश मंडळ राबवत आहे ही एक चांगली गोष्ट आहे. कल्याण शहरामध्ये नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात हे मंडळ काम करत आहे. मी सदैव आपल्यासोबत आहे असे प्रमुख अतिथी सर्जेराव पाटील यांनी सांगितले. अहिराणी भाषेचे महत्त्व, तसेच खानदेशातील महत्त्वाच्या गोष्टींचे महत्त्व बापूसाहेब हटकर यांनी विशद केले. आता खानदेशाचे नाव कान्हदेश झाले पाहिजे आणि यासाठी उत्तर महाराष्ट्र खानदेश मंडळ पाठपुरावा करेल असेही हटकर म्हणाले. या वेळी उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील, महिला आघाडी अध्यक्ष भारती वानखेडे, सचिव वर्षा पाटील, कार्याध्यक्ष आशा भामरे तसेच मंडळाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तत्पूर्वी कार्यक्रमाचे स्वागत गीत विद्या अहिरे, धनश्री बुवा, हर्षला शिणकर, यांनी सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा पाटील आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैदेही पाटील यांनी केले. या वेळी सुभाष सरोदे, प्रकाश माळी, अनिरुद्ध चव्हाण, प्रवीण सानेर, बागुल, प्रभाकर बोरसे यांच्यासह असंख्य खानदेशी नागरिक उपस्थित होते, अशी माहती विनोद शेलकर यांनी दिली.