ऑक्टोबरपर्यंत पालिका निवडणुका होणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑक्टोबरपर्यंत पालिका निवडणुका होणार नाही
ऑक्टोबरपर्यंत पालिका निवडणुका होणार नाही

ऑक्टोबरपर्यंत पालिका निवडणुका होणार नाही

sakal_logo
By

वाशी, ता. १४ (बातमीदार) : राज्यातील सरकारमध्ये निवडणुका घेण्याची हिंमत नसल्याने ऑक्टोबर महिन्यापर्यंत निवडणुका होणार नाहीत. आताचे सरकार सुडाचे राजकारण करत असल्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत मतदारांनी सरकारला जागा दाखवून दिली आहे. त्यामुळे सरकार लवकर निवडणुका घेणार नसल्याचे प्रतिपादन आमदार तथा माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले. नवी मुंबईतील दिघा येथे हळदी-कुकूं कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी माजी खासदार आनंद परांजपे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

सध्याचे सरकार सूडबुध्दीचे राजकारण करत असून खोटे गुन्हे दाखल करत आहे. नवी मुंबईत एम. के. मढवी, मनोज हळदणकर यांना त्रास देण्यात येत आहे. आम्ही फक्त ‘मातोश्री’ची शिवसेना ओळखतो. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असणाऱ्यांनाच शिवसैनिक म्हणून आम्ही ओळखतो. नवी मुंबईत महाविकास आघाडीचा लवकरच मेळावा होणार असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्रच पालिका निवडणूक लढणार आहे. नवी मुंबईत आमदार मंदा म्हात्रे या गणेश नाईक यांच्याविरोधात विरोधक म्हणून ठाम उभ्या राहिल्या, असे म्हणत त्यांच्यावर आव्हाड यांनी स्तुती सुमने उधळली.