मेट्रो ५ प्रकल्पासंबंधी सल्लागाराची नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रो ५ प्रकल्पासंबंधी सल्लागाराची नियुक्ती
मेट्रो ५ प्रकल्पासंबंधी सल्लागाराची नियुक्ती

मेट्रो ५ प्रकल्पासंबंधी सल्लागाराची नियुक्ती

sakal_logo
By

कल्याण, ता. १४ (बातमीदार) ः मेट्रो मार्ग ५ दुर्गाडी चौक - खडकपाडा - बिर्ला कॉलेज - उल्हासनगरच्या विस्ताराची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी तपशीलवार प्रकल्प तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती संबंधित विभागाने केली आहे. यासाठी शिवसेनेने पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाले असल्याची माहिती शिवसेना कल्याण पश्चिम शहरप्रमुख रवी पाटील यांनी दिली.

मेट्रोचा मार्ग बदलून दुर्गाडी चौक-खडकपाडा-बिर्ला कॉलेज-प्रेमऑटो असा असावा, याकरिता सर्वात प्रथम म्हणजेच २०१६ पासून माझा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती रवी पाटील यांनी दिली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्यासमोर रवी पाटील यांनी प्रस्ताव मांडला होता. मागील महिन्यात कल्याणमध्ये झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो ५ कल्याण पश्चिममध्ये म्हणजेच दुर्गाडी ते खडकपाडा आणि बिर्ला कॉलेज ते उल्हासनगर असा विस्तारित मार्ग होणार असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, या कामाकरीता एमएमआरडीएकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आयुक्त यांच्या उपस्थितीत बैठक लावून विस्तारित मेट्रो ५ संदर्भात तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच या मेट्रो कामाचादेखील आरंभ होणार आहे.