तन्वी फाऊंडेशनतर्फे महिला दिन

तन्वी फाऊंडेशनतर्फे महिला दिन

दिवा, ता. १४ (बातमीदार) : दिवा भाजप महिला अध्यक्षा ज्योती पाटील, भाजप दिवा मंडळ व तन्वी फाउंडेशनच्या वतीने महिलांचा सन्मान सोहळा नुकताच पार पडला. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून भारतीय जनता पक्ष ठाणे जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा मृणाल पेंडसे उपस्थित होत्या. त्याचबरोबर दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे हे देखील उपस्थित होते.

या वेळी बोलताना मृणाल पेंडसे यांनी ज्योती पाटील यांच्या कामाचे कौतुक करताना दिव्यातील महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केवळ ज्योती पाटील करत असल्याचे सांगितले. तर, रोहिदास मुंडे यांनी दिव्यात भारतीय जनता पार्टीचे आठही नगरसेवक निवडून आणण्यासाठी महिलांनी निर्धार करावा, असे आवाहन केले. दिव्यातील महिला अनेक समस्यांचा सामना करत असतात या समस्या सोडवण्यासाठी आता महिलांनी एकजूट व्हावे असे आवाहन रोहिदास मुंडे यांनी केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री मेघा घाडगे देखील उपस्थित होत्या. त्याचबरोबर ठाणे शहर महिला मोर्चाच्या अध्यक्ष मृणाल पेंडसे, माधुरी मेटांगे, सरचिटणीस रक्षा यादव, उपाध्यक्ष नताशा सोलकर, चिटणीस शितल कारंडे, चिटणीस शालू पालकर, सचिव महाराष्ट्र प्रदेश उत्तरभारतीय महिला मोर्चा बिंदू दुबे, भाजपचे जेष्ठ नेते शिवाजी आव्हाड, दिवा शहराध्यक्ष रोहिदास मुंडे, ठाणे शहर कार्यकारणी सदस्य विजय भोईर, ठाणे शहर युवा मोर्चा उपाध्यक्ष सतीश केळशीकर, दिवा सरचिटणीस युवराज यादव, समीर चव्हाण, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर, व्यापारी जिल्हाध्यक्ष जयदीप भोई, वार्ड अध्यक्ष नागेश पवार, राहुल साहू, अशोक गुप्ता, अवधराज राजभर, प्रफुल साळवी, आरपीआय दिवा महिला शहराध्यक्ष शीला त्रिभुवने, मनसे शाखा अध्यक्ष निकिता सानप, रुणवाल माय सिटी नेहा टिल्लू, वामन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com