Wed, May 31, 2023

अल्पवयीन मुलीचे अलिबागमधून अपहरण
अल्पवयीन मुलीचे अलिबागमधून अपहरण
Published on : 14 March 2023, 11:07 am
अलिबाग (बातमीदार) ः अलिबाग तालुक्यातील खंडाळे येथील अल्पवयीन मुलीचे अलिबागे येथून सोमवारी सायंकाळी अपहरण झाले आहे. याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अपहरण केलेली मुलगी सतरा वर्षांची आहे. बारावीच्या परीक्षेसाठी ते अलिबागमधील शाळेत गेली होती. मात्र, सायंकाळी घरी आली नसल्याने तिला कोणीतरी फूस लावून नेल्याचा संशय पालकांना आहे. त्यामुळे याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात बोरघर परिसरातील एका व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.