Wed, June 7, 2023

शिवजयंतीनिमित्त शिवचरित्रपर व्याख्यान
शिवजयंतीनिमित्त शिवचरित्रपर व्याख्यान
Published on : 14 March 2023, 11:25 am
जुईनगर (बातमीदार) : सानपाड्यातील शिवप्रेरणा प्रबोधन ट्रस्टच्या वतीने दर वर्षीप्रमाणे सेक्टर १० येथील बाजार संकुलातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती उत्सव पार पडला. या वेळी शिवचरित्र या विषयावर डॉ. परीक्षित शेवडे यांच्या शिवव्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिवहन समिती सदस्य विसाजी लोके यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उत्कृष्ट पाककृती स्पर्धा घेण्यात आली होती. विजेत्या महिलांचा पारितोषिक देत गौरव करण्यात आला. या वेळी गणेश मानकर, मिलिंद खोपकर, सूर्यकांत पाटील, मंगेश धोंडे, गणेश पावगे, विकास गाढवे, सूर्यकांत झेंडे, अविनाश जाधव, केदार तेंडुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.