Sun, May 28, 2023

आरटीओमधील कर्मचारी संपावर
आरटीओमधील कर्मचारी संपावर
Published on : 14 March 2023, 12:01 pm
कल्याण, ता. १४ (बातमीदार) ः जुनी पेन्शन योजना राज्य सरकारने लागू करावी, या मागणीसाठी मंगळवारपासून (ता. १४) कर्मचारी महासंघाने राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. त्याला मोटार वाहन विभाग आरटीओ कर्मचारी संघटनेकडून पाठिंबा देण्यात आला.
मोटार वाहन विभाग आरटीओ कर्मचारी संघटना, कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. त्यानंतर सर्व कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी झाले. याचा आरटीओ कार्यालयातील कामकाजावर परिणाम झाला आहे.