Fri, June 9, 2023

विजेचा खांब रस्त्यावर पडला
विजेचा खांब रस्त्यावर पडला
Published on : 14 March 2023, 11:19 am
नेरूळ (बातमीदार) : शहरातील सेक्टर १६ येथे दोन महिन्यांपूर्वी नव्याने बसवण्यात आलेला विजेचा खांब रस्त्यावर पडला. मोठी दुर्घटना टळली आहे, मात्र या घटनेला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांमधून उमटत आहे. शहरात नव्याने आणि काँक्रीटीकरण पाया असलेला खांब काही आठवड्यांपूर्वी बसवण्यात आला होता. हा खांब शुक्रवारी (ता. १०) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एका सोसायटीच्या सुरक्षा भिंतीवर पडला. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. हा खांब एखाद्या नागरिकाच्या अंगावर किंवा वाहनावर पडून दुर्घटना घडली असती, तर कोण जबाबदार होते? या कामाची चौकशी करण्याची मागणी मनसेचे पदाधिकारी सविनय म्हात्रे यांनी केली आहे.