
साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. प्रशांत पाटील
विरार, ता. १४ (बातमीदार) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कोकण प्रदेशांतर्गत पालघर तालुका शाखा आयोजित सातव्या छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी, लेखक लायन डॉ. प्रशांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तसेच या वेळी सांगली येथील प्रसिद्ध कवी अशोक पवार व सुधीर दांडेकर उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन भूपेंद्र संखे यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्षपद साहित्य परिषदेच्या पालघर जिल्हाध्यक्षा प्रा. शुभम पाटील या भूषवणार आहेत.
१९ मार्च २०२३ रोजी स्व. किशोर संखे हॉल बोईसर, जिल्हा पालघर येथे दुपारी २ वाजता हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ग्रंथपूजनाने साहित्य संमेलनाची सुरुवात होणार असून उद्घाटन समारंभ, प्रास्ताविक, मान्यवरांचे मनोगत, काव्यसंमेलन असे कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. या साहित्य संमेलनास संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, उपाध्यक्षा शुभांगी काळभोर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे.
---------------------
कविता पाठवण्याचे आवाहन
साहित्य संमेलनाच्या काव्यसंमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवी, कवयित्री, विद्यार्थी आणि नवोदित साहित्यिक यांनी आपली कविता ९९७५५६२८०३ अथवा ९४०५०८१५६७ या क्रमांकावर १८ मार्च २०२३ पर्यंत पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या आयोजनासाठी कोकण प्रदेश अध्यक्ष डॉ. अ. ना. रसनकुटे यांच्या अध्यक्षतेखाली विचारविनिमय बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत डॉ. अलका नाईक, शंकरसुत संदीप तोडकर, प्रा. शुभम पाटील, डॉ. कमलाकर संखे, ऊर्मिला घरत, भूपेंद्र संखे आदी मान्यवर उपस्थित होते.