Sun, March 26, 2023

तहसीलदार अंधारे यांनी स्वीकारला पदभार
तहसीलदार अंधारे यांनी स्वीकारला पदभार
Published on : 14 March 2023, 10:52 am
वाडा, ता. १४ (बातमीदार) : वाडा तहसीलदार पदाचा कार्यभार भाऊसाहेब अंधारे यांनी सोमवारी (ता. १३) स्वीकारला. वाड्याचे तत्कालीन तहसीलदार उद्धव कदम यांची बदली झाल्याने त्यांच्याजागी तहसीलदार म्हणून भाऊसाहेब अंधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी त्यांनी पदभार स्वीकारला. अंधारे यांनी यापूर्वी बोरीवली व उरण येथे तहसीलदारपदी काम केले आहे. काही वर्षांपूर्वी अंधारे यांनी वाडा येथे निवासी नायब तहसीलदारपदी काम केले असून त्यांना येथील कामाचा अनुभव आहे.