लेखक पॉल रुमाव यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेखक पॉल रुमाव यांचे निधन
लेखक पॉल रुमाव यांचे निधन

लेखक पॉल रुमाव यांचे निधन

sakal_logo
By

वसई, ता. १४ (बातमीदार) : मराठी भाषेचे अध्यापक, लेखक अशी ओळख असलेले नंदाखाल-विरार येथील पॅाल रुमाव (वय ९८) यांचे शनिवारी (ता. ११) राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली व मुलगा, जावई, सून व नातवंडे असा परिवार आहे. रुमाव यांचे शिष्य व ९३ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विचारवंत, लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पॉल रुमाव यांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘म्हणी अनुभवाच्या खाणी’ आणि ‘बोलकी चित्रे’ ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. फादर कोरिया आणि बाबतीस दाबरे यांच्यासह त्यांनी ‘सामवेदी बोली भाषा"आणि ‘मधाच्या घागरी" ही पुस्तके लिहिली आहेत. त्यांना मोडी भाषा अवगत होती. तसेच त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.