उकाड्यावर कलिंगडाची मात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उकाड्यावर कलिंगडाची मात्रा
उकाड्यावर कलिंगडाची मात्रा

उकाड्यावर कलिंगडाची मात्रा

sakal_logo
By

वसई, ता. १४ (बातमीदार) : उन्हाळा वाढल्यामुळे पालघर जिल्ह्यात कलिंगड खरेदीला मागणी वाढली आहे. त्यामुळे विविध ठिकाणी विक्रेते दाखल झाले आहेत. त्याचबरोबर स्टॉलवर बर्फाच्या लादीमध्ये ठेवलेल्या कलिंगड, अननसाच्या फोडीदेखील विक्री केल्या जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
उकाड्यात कलिंगड शरीराचा दाह कमी करतो. पाण्याची कमतरता टाळण्यासाठी नैसर्गिक फळ म्हणून कलिंगडकडे पाहिले जाते. सध्या उकाडा सुरू झाल्याने कडाक्याच्या उन्हात उत्तम पर्याय म्हणून नागरिक खरेदी करत आहेत. कलिंगडात ८० टक्के पाण्याचे प्रमाण असते; तर व्हिटॅमिन सी, ए, बी, लोह, कॅल्शियम अशा खनिजांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या फळाला नागरिक पसंती देत आहेत. सर्वांत लहान कलिंगड २० ते ३० रुपयांना मिळते; तर मोठ्या कलिंगडाची किंमत १०० ते १२० रुपये इतकी आहे.

---------
लहान कलिंगडाला आतून लाल रंग व गोडी कमी असते. त्यामुळे मोठे व लालभडक खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा कल अधिक असतो. यंदा बाजारात आलेल्या कलिंगडाची किंमत जास्त नाही. त्यामुळे ग्राहकांचा खरेदीकडे कल वाढला आहे.
- प्रवीण यादव, विक्रेता

----------
उन्हाळ्यात हंगामी फळ कलिंगड हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे खरेदी करतो. लाल व चविष्ट अशा कलिंगडाची निवड करतो. रासायनिक पदार्थ वापरलेल्या पेयापेक्षा नैसर्गिक कलिंगड रस पिणे हितकारक आहे.
- रॉबी रेमेडियस, ग्राहक