Wed, June 7, 2023

आरोग्य शिबिराचा २०७ नागरिकांना लाभ
आरोग्य शिबिराचा २०७ नागरिकांना लाभ
Published on : 14 March 2023, 10:52 am
वसई, ता. १४ (बातमीदार) : बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव व महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अजीव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बहुजन विकास आघाडी झोपडपट्टी सेल कमिटीने फादर एग्नेल इंग्लिश स्कूल, वीर सावरकर मार्ग, ईदगाह कंपाऊंड आदी ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. २०७ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. याप्रसंगी परिवहन समिती सदस्य वसंत वरे, बहुजन विकास आघाडी झोपडपट्टी सेल कमिटी अध्यक्ष प्रदीप मिश्रा, उपाध्यक्ष बिलाल पठान, संघटन सचिव गीता आयरे, पप्पू गुप्ता, गनी शेख, सिकंदर बादशाह यांच्यासह नागरिक उपस्थित होते.