Sun, May 28, 2023

डहाणूत काँग्रेसचा निषेध मोर्चा
डहाणूत काँग्रेसचा निषेध मोर्चा
Published on : 14 March 2023, 10:53 am
डहाणू, ता. १४ (बातमीदार) : डहाणू तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने डहाणू स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयुर्विमा महामंडळ कार्यालयावर निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि एलआयसी तसेच एसबीआय बँकेने अदानी उद्योग समूहाला दिलेल्या हजार कोटीच्या बेकायदेशीर कर्जाचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. सोमवारी (ता. १३) सकाळी डहाणू रोड रेल्वे स्थानक परिसरातून काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात काँग्रेसचे पालघर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, पराग पष्टे, जिल्हा उपाध्यक्ष मोईज शेख, तालुकाध्यक्ष संतोष मोरे, राजश्री अहिरे आणि कार्यकर्ते होते.