Tue, March 28, 2023

वाडा तहसील कार्यालयात शुकशुकाट
वाडा तहसील कार्यालयात शुकशुकाट
Published on : 14 March 2023, 10:12 am
वाडा, ता. १४ (बातमीदार) : जुनी पेन्शन योजना राज्य सरकारने लागू करावी, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार (ता. १४) पासून कर्मचारी महासंघाने बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे शासकीय कार्यालयात सोमवारी शुकशुकाट दिसून आला. यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांची मात्र गैरसोय झाली. बेमुदत संपामुळे वाडा तहसील, पंचायत समिती कार्यालय आदी कार्यालयातील कामकाज आज ठप्प झाले होते. त्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांची मात्र गैरसोय झाल्याचे दिसून आले.