डहाणूत रुग्णसेवा सुरळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डहाणूत रुग्णसेवा सुरळीत
डहाणूत रुग्णसेवा सुरळीत

डहाणूत रुग्णसेवा सुरळीत

sakal_logo
By

डहाणू, ता. १४ (बातमीदार) : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याच्या मागण्यांसाठी सोमवारपासून (ता. १४) सर्व सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना संप पुकारला आहे. नवीन शैक्षणिक धोरण रद्द करावे, निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे, अशा विविध स्वरूपाच्या १८ मागण्यांसाठी सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायत कर्मचारी समन्वय समितीच्या आवाहनाप्रमाणे संप करण्यात आला आहे. डहाणूतील सर्व सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयात तुरळक कर्मचाऱ्यांची उपस्थिती जाणवत होती.
तहसीलदार कार्यालयात तहसीलदार अभिजीत देशमुख आणि काही कर्मचारी उपस्थित होते; तर डहाणू पंचायत समितीत गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांच्याव्यतिरिक्त कोणीही कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे सगळीकडे शुकशुकाट पसरला होता. डहाणू उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका आणि काही अन्य कर्मचारी संपावर गेल्याने उपस्थिती कमी असली, तरी रुग्णसेवा सुरळीत सुरू असल्याचे उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. बी. डी. हिंगणे यांनी सांगितले.