विक्रमगडमध्ये शिवजयंती उत्सव साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगडमध्ये शिवजयंती उत्सव साजरा
विक्रमगडमध्ये शिवजयंती उत्सव साजरा

विक्रमगडमध्ये शिवजयंती उत्सव साजरा

sakal_logo
By

विक्रमगड, ता. १४ (बातमीदार) : स्वराज्य ग्रुपतर्फे विक्रमगड शहरात शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विक्रमगड बाजारपेठेतील भव्य मैदानावर मंडपात विक्रमगड पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रदीप गीते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी स्वराज्य ग्रुप विक्रमगडचे अध्यक्ष ऋषिकेश ढोन्नर, शिवसेना विक्रमगड तालुकाप्रमुख सागर आळशी, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) विक्रमगड तालुकाप्रमुख संजय आगिवले, विजय पाटील, मंगेश पाटील, श्रमजीवी संघटनेच्या पौर्णिमा पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना स्वराज्य ग्रुपतर्फे फळांचे वाटप करण्यात आले. सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत महाराजांची मिरवणूक शहरातून काढण्यात आली.