राष्ट्रीय कराटेत पालघर जिल्ह्याचे यश

राष्ट्रीय कराटेत पालघर जिल्ह्याचे यश

कासा, ता. १४ (बातमीदार) : महाराष्ट्र कराटे स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ ठाणे यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय ओपन कराटे स्पर्धा नुकत्याच अंबर इंटरनॅशनल स्कूल, ठाणे येथे पार पडल्या. या स्पर्धेत आशीष सुतार - दोन सुवर्ण, श्रेयष चव्हाण - सुवर्ण व कास्य, सक्षम टोपले - सुवर्ण व कास्य, सचिन हिंगे - कांस्य, तेजस सोमण - कांस्य, कृष्णा हिंगे - कास्य पदक मिळवून यश संपादन केले. ही स्पर्धा विविध वयोगटात व वजन गटांत पार पडली. या स्पर्धेत पाच राज्यातील ५३५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेत पंचपदी नासिर मुलानी, अनिल मराठे, गणेश भोईर, खंडू इंगोले, रूपेश राठोड, प्रफुल्ल कदम, गणेश शिंदे, जीवन गौड यांनी काम पाहिले. या सर्व कराटेपटूंना अखिल भारतीय कराटे महासंघाचे प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय कराटेपटू पालघर जिल्हा कराटे असोसिएशनचे अध्यक्ष व कासा येथील पूज्य आचार्य भिसे विद्यालयाचे आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. निलेश आत्माराम गायकवाड व महिला प्रशिक्षक शीतल मुकणे यांनी मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com