चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

sakal_logo
By

नालासोपारा, ता. १४ (बातमीदार) : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना नालासोपाऱ्यात उघडकीस आला आहे. हत्येनंतर आरोपी पती स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. याबाबत तुळिंज पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रभूनाथ विश्वकर्मा असे आरोपी पतीचे नाव आहे, तर अनिता विश्वकर्मा असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. नालासोपारा पूर्व वालाईपाडा या परिसरात हे दाम्पत्य राहत होते. त्यांना २ आणि ३ वर्षाचे दोन मुले आहेत. आरोपी हा एका खासगी कंपनीत काम करीत होता, तर पत्नी गृहिणी होती. पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून या दोघात नेहमी वादविवाद होत होता. सोमवार (ता. १३) नेहमीप्रमाणे या दोघांत वाद झाला असता राहत्या घरातच पतीने पत्नीची टॉवेलने गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर दोन मुले आणि पत्नीचा मृतदेह घरातच ठेवून आरोपीने पोलिस चौकीत हजर होत हत्येची कबुली दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन, आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केले आहे.