Thur, June 1, 2023

तळा तालुक्यातील कर्मचारी सहभागी
तळा तालुक्यातील कर्मचारी सहभागी
Published on : 14 March 2023, 11:35 am
तळा ः जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात तळा तालुक्यातील जवळपास १५० कर्मचारी सहभागी झाले होते. बळीचा नाका परिसरात कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन घोषणाबाजी केली.
नवीन पेन्शन योजना रद्द करण्याची आग्रही मागणी आंदोलकांनी यावेळी केली. तसेच एकच मिशन जुनी पेन्शन असा नारा देत मोर्चा काढण्यात आला. या वेळी आंदोलनामध्ये तालुका प्रशासन, जिल्हा परिषदचे शिक्षक, महसूल, आरोग्य विभागातील व कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.