संपामुळे कार्यालयीन कारभार ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संपामुळे कार्यालयीन कारभार ठप्प
संपामुळे कार्यालयीन कारभार ठप्प

संपामुळे कार्यालयीन कारभार ठप्प

sakal_logo
By

मोखाडा, ता. १४ (बातमीदार) : जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यातील कर्मचारी संघटनांनी संपाचे हत्यार उपसले आहे. त्याचा मोठा परिणाम मोखाडा तालुक्यात झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील कार्यालये ओस पडली आहेत. तसेच शाळांमधील किलबिलाट बंद झाला आहे; मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे.
राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी संघटनांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी (ता. १४) संप पुकारण्यात आला. कर्मचारी संपावर गेल्याने मोखाड्यात सरकारी कार्यालये ओस पडली आहेत. मोखाडा पंचायत समितीमधील ५१३ कर्मचाऱ्यांपैकी ४५८ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. केवळ ४७ अधिकारी आणि कंत्राटी कर्मचारी तालुक्याचा कारभार पाहत आहे. तहसीलदार कार्यालयातील ३५ कर्मचाऱ्यांमधील २६ कर्मचारी संपात उतरले. आरोग्य विभागातील ८१ कर्मचाऱ्यांमधील ७१ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. तालुक्यातील १५४ जिल्हा परिषद शाळांसाठी ३६२ शिक्षक आहेत. यामधील विविध शिक्षक संघटनांमधील ३३३ शिक्षक संपात सहभागी झाले आहेत. तालुक्यात केवळ १५ शाळा सुरू असुन इतर शाळा संपामुळे बंद पडल्याने शाळांमधील किलबिलाटही बंद झाला आहे.

----------------
परीक्षा, पाणीपुरवठा सुरळीत
आरोग्य विभागाचे कर्मचारी संपात सहभागी झाल्याने आरोग्य केंद्राबाहेरचे लसीकरण तसेच सर्व्हेक्षण बंद झाले आहे. दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षा तसेच पाणीपुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी नियोजन केल्याची माहिती गटविकास अधिकारी कुलदीप जाधव यांनी दिली आहे.