ठाण्यात इमारतीच्या कॉलमला तडे

ठाण्यात इमारतीच्या कॉलमला तडे

ठाणे, ता. १४ (वार्ताहर) : ठाण्याच्या नौपाडा परिसरातील शृंगारपुरे हाऊस या दोन माळ्याच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील बेडरूम आणि हॉलचे प्लास्टर पडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही; मात्र इमारतीच्या कॉलमला तडे गेल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. ठाण्याच्या नौपाडा परिसरातील टायटन शोरूमसमोर, शृंगारपुरे हाऊस ही ५० वर्षांपेक्षा अधिक काळ जुनी दोनमजली इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या नम्रता शृंगारपुरे यांच्या घराचा हॉल आणि बेडरूमधील स्लॅब पडल्याची घटना सोमवारी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. इमारतीच्या कॉलमला पडलेल्या तड्यांमुळे इमारत धोकादायक झालेली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नौपाडा प्रभाग समिती अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान दाखल होत पाहणी केली. दरम्यान, पालिकेने सुरक्षेच्या दृष्टीने दुसऱ्या माळ्यावरील रूम नं. २ ही रिकामी करत सील केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com