ठाण्यात फसवणुकीचे दोन गुन्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात फसवणुकीचे दोन गुन्हे
ठाण्यात फसवणुकीचे दोन गुन्हे

ठाण्यात फसवणुकीचे दोन गुन्हे

sakal_logo
By

ठाणे, ता. १४ (वार्ताहर) : ठाण्याच्या वर्तकनगर आणि राबोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून या दोन्ही घटनांमध्ये २ लाख ४६ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वर्तकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५३ वर्षीय फिर्यादी महिला या मैथली पार्क येथून पोखरण रोडने घरी जात असताना त्यांच्याजवळ दोन अज्ञातांनी येत त्यांना आपण पोलिस असल्याचे सांगितले. या वेळी फिर्यादी महिलेला बोलण्यात गुंतवून १ लाख २० हजार रुपयांचे मंगळसूत्र, कानातील बुगडी आणि बांगडी हातचलाखीने काढून घेत गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. दुसरीकडे फसवणुकीची दुसरी घटना राबोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. एका ५७ वर्षीय महिला (रा. श्रीरंग सोसायटी) यांना कोणी तरी अज्ञात मोबाईलधारक इसमाने फोन करून कुरिअर सर्व्हिस उपलब्ध करून देतो, असे खोटे सांगून एक लिंक पाठवली. फिर्यादीने यांनी लिंक ओपन केली असता फिर्यादी यांच्या बँक खात्यातून १ लाख २६ हजार ३०० रुपयांची रक्कम काढून घेत आर्थिक फसवणूक केली. याबाबत अज्ञात आरोपींच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन्ही घटनांमध्ये पोलिस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.