मुलीच्या अपहरण व लैंगिक अत्याचार प्रकरणात दोघा नातेवाईकांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलीच्या अपहरण व लैंगिक अत्याचार
प्रकरणात दोघा नातेवाईकांना अटक
मुलीच्या अपहरण व लैंगिक अत्याचार प्रकरणात दोघा नातेवाईकांना अटक

मुलीच्या अपहरण व लैंगिक अत्याचार प्रकरणात दोघा नातेवाईकांना अटक

sakal_logo
By

मुंबई : कुर्ला परिसरात १४ वर्षीय मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विनोबा भावेनगर पोलिसांनी दोघांना अटक केली. विशेष म्हणजे दोन्ही आरोपी पीडितेचे नातेवाईक आहेत. त्यांनी मुलीला कोलकात्याला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. दोन्ही आरोपी अनुक्रमे १९ आणि ३५ वर्षीय असून ते कुर्ला पश्चिम येथील रहिवासी आहेत. आरोपींनी पीडितेच्या आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन राहत्या घरातून तिचे अपहरण केले होते. त्यानंतर मुलीला कोलकात्याला नेऊन तिथे एका खोलीत डांबून ठेवले. मुलीची सुटका झाल्यानंतर तिने आई-वडिलांना सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर याप्रकरणी विनोबा भावेनगर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपींना अटक केली.