
एअर इंडियाची ‘सेल्सफोर्स’सोबत भागीदारी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : भारतातील आघाडीची विमान कंपनी आणि स्टार अलायन्स सदस्य एअर इंडियाने आपल्या ग्राहक सेवांना तंत्रज्ञानामध्ये परावर्तीत करण्यासाठी ‘सेल्सफोर्स’सोबत भागीदारीची घोषणा केली. या भागीदारीमुळे एअर इंडिया सर्व प्रमुख टचपॉईंट्सवर ऑनलाइन, प्रत्यक्ष आणि हवेतदेखील प्रवाशांसोबत कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (आर्टिफिशियल इंटिलिजन्स) परस्परसंवाद साधणे शक्य होणार आहे.
एअर इंडियाच्या सर्व प्रमुख टच पॉइंट्सवरील कर्मचारी युनिफाईड डेटा प्लॅटफॉर्म आणि एआय-सहायक साधनांसह प्रत्येक ग्राहकाशी सुसंवाद साधतील. सिलिकॉन व्हॅलीतील एक आद्य व अग्रणी कंपनी ‘सेल्सफोर्स’सोबत काम करताना त्यांच्या आइन्स्टाईन आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सची क्षमता आणि युनिफाईड कस्टमर डेटा प्लॅटफॉर्मचा लाभ घेताना आम्हाला आनंद होत आहे, आम्ही आमच्या ग्राहक सेवेला जागतिक स्तरावर अधिक प्रभावीपणे सादर करू, असे एअर इंडियाचे मुख्य डिजिटल आणि तंत्रज्ञान अधिकारी डॉ. सत्य रामस्वामी म्हणाले. सेल्सफोर्सकडून पुरवल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामुळे एअर इंडियाला त्यांच्या सर्व संपर्क केंद्रांवर, मोबाईल, वेब, चॅटबोट, ई-मेल, सोशल मीडिया आणि इतर चॅनल्सवरही ग्राहकांसोबत परस्पर संवाद साधणे शक्य होणार आहे. यातून ग्राहकांच्या प्रश्नांची तसेच समस्यांची वेगवेगळ्या चॅनेल्सवरील माहिती एकाच ठिकाणी प्राप्त होईल.