पश्चिम रेल्वेच्या सहा विशेष गाड्यांना मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पश्चिम रेल्वेच्या सहा विशेष गाड्यांना मुदतवाढ
पश्चिम रेल्वेच्या सहा विशेष गाड्यांना मुदतवाढ

पश्चिम रेल्वेच्या सहा विशेष गाड्यांना मुदतवाढ

sakal_logo
By

पश्चिम रेल्वेच्या सहा विशेष गाड्यांना मुदतवाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन त्यांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने सहा अतिरिक्त विशेष गाड्यांची मुदत वाढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गर्दीपासून दिलासा मिळणार आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०९०३९ वांद्रे टर्मिनस - अजमेर साप्ताहिक विशेष जी यापूर्वी २९ मार्च २०२३ पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती. ती आता २८ जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे; तर ट्रेन क्रमांक ०९०४० अजमेर - वांद्रे टर्मिनस साप्ताहिक विशेष जी पूर्वी ३० मार्च २०२३ पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती ती आता २९ जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक ०९००७ वलसाड - भिवानी साप्ताहिक विशेष जी पूर्वी ३० मार्च २०२३ पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती. ती आता २९ जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक ०९००८ भिवानी - वलसाड साप्ताहिक विशेष जी पूर्वी ३१ मार्च २०२३ पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती ती आता ३० जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक ०९४३५ अहमदाबाद – ओखा साप्ताहिक विशेष जी पूर्वी २५ मार्च २०२३ पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती ती आता १ जुलै २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक ०९४३६ ओखा – अहमदाबाद साप्ताहिक विशेष जी पूर्वी २६ मार्च २०२३ पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती, आता २ जुलै २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.