
ठाण्यात ‘सकाळ’तर्फे महारेरा मोफत सेमिनार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : रिअल इस्टेट व्यवसायात आपले करिअर करणाऱ्या प्रत्येकाला आता महारेरा प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या माध्यमातून ठाण्यातील रिअल इस्टेट एजंट्स यांच्यासाठी मोफत महारेरा प्रशिक्षण सेमिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात गुरुवार (ता.१६) रोजी हे सेमिनार घेण्यात येणार आहे.
घर, जमीन किंवा स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीसंदर्भात ग्राहकांशी संवाद साधणाऱ्या प्रत्येकालाच महारेरा प्रमाणपत्र प्रशिक्षण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या माध्यमातून रिअल इस्टेट एजेंट्स व ग्राहक यांच्यातील विश्वास वृद्धिंगत होण्याबरोबरच रिअल इस्टेट कन्सल्टंट व्यवसायाला कायदेशीर व्यासपीठावर आणण्याचा उद्देश आहे. त्यामुळे ‘सकाळ’र मध्यम समूहाच्या माध्यमातून ठाणे शहरातील रिअल इस्टेट एजंट्स यांच्यासाठी मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. हे सेमिनार ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात १६ मार्च रोजी दुपारी ४.०० ते सायंकाळी ७.०० या कालावधीत पार पडणार आहे. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, बांधकाम व्यावसायिक जितेंद्र मेहता आणि महारेरा प्रणित प्रशिक्षक अभयकुमार हेवरियाल इस्टेट एजंट्सना मार्गदर्शन करणार आहेत.